एप्रिलच्या सुरुवातीलाच सोने-चांदी गगनाला भिडले, जाणून घ्या आजचे नवे दर…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

आज १ एप्रिल रोजी सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी आणखी महागले आहेत. विशेषतः अमेरिका, इराण आणि इस्रायल मधील संघर्षामुळे तसेच डॉलरच्या मूल्यामध्ये होत असलेल्या चढउतारांमुळे या मौल्यवान धातूंच्या किमतींवर थेट आणि मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.

लग्नसराईचा काळ जवळ आल्यामुळे सराफांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे, सोबतच रुपयाचे मूल्य घटल्याने आणि जागतिक स्तरावर किमती वधारल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याने उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास, सध्या प्रति औंस सोन्याचा स्पॉट दर ४,६५२.३१ डॉलरवर गेला आहे. याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्या मते, इराणचे युद्ध आगामी दोन ते तीन आठवड्यांत संपुष्टात येऊ शकते कारण लष्करी उद्दिष्टे पूर्ण झाल्याने अमेरिका या भागातून माघार घेण्याच्या तयारीत आहे.

दरांचा विचार केल्यास आज राजधानी दिल्ली मध्ये २४ कॅरेट सोन्यासाठी १,४९,६७० रुपये तर २२ कॅरेटसाठी १,३७,२१० रुपये (प्रति १० ग्रॅम) मोजावे लागतील. दुसरीकडे, मुंबई, पुणे बंगळुरू आणि कलकत्ता या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४९,५२० रुपये आणि २२ कॅरेटचा भाव १,३७,०६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका समान आहे. चेन्नई शहरात मात्र २४ कॅरेटसाठी १,४९,१२० रुपये तर २२ कॅरेटसाठी १,३६,६९० रुपये दर निश्चित झाला आहे. दरम्यान, २ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात २१,३०० रुपयांची म्हणजेच १२.३ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली होती.

सोन्याच्या वाढत्या आलेखासोबतच चांदीनेही आज दरवाढीची दिशा पकडली आहे. आज १ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात चांदीचा भाव प्रति किलो २,५०,१०० रुपयांपर्यंत वधारला आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये चांदीच्या स्पॉट दराने प्रति औंस ७४.६४ डॉलर्सची पातळी गाठली आहे.

याआधी मार्च महिन्याच्या २ ते ३० तारखेपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, चांदीमध्ये ६३ हजार रुपयांची म्हणजेच तब्बल २१ टक्क्यांची प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला चांदीच्या बाजारभावाने विक्रमी पातळी ओलांडली होती. जानेवारी महिन्यामध्येच चांदीच्या दराने थेट ४ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, त्यानंतरच्या काही महिन्यांत बाजारात झालेल्या बदलांमुळे चांदीच्या किमती वेगाने खाली आल्या. आता नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मात्र पुन्हा एकदा चांदीत वाढीचे संकेत मिळत असल्याने ग्राहकांचे लक्ष याकडे लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!