सोन्या -चांदीच्या दराची गाडी सुसाट ; सोनं 2883 रुपयांनी तर चांदीत 14475 रुपयांची वाढ

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सोन्याचे एका तोळ्याचे दर 2883 रुपयांनी महागले आहेत. चांदीच्या दरात एका दिवसात 14475 रुपयांची वाढ झाली आहे.

सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा दर प्रति ग्रॅम 1 लाख 42 हजार 290 रुपये आहे. त्याप्रमाणं 23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 2871 रुपयांनी वाढून 139444 रुपये तोळावर पोहोचला आहे. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 143627 रुपये किलो आहे.

22 कॅरेट सोन्याच्या दरात 2641 रुपयांची वाढ झाली आहे. आज एक तोळे सोन्याचा दर 128245 रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा एखा तोळ्याचा दर 132092 रुपये किलो आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 105004 रुपये इतका आहे. जीएसटीसह याचा दर 108154 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरात 1687 रुपयांनी वाढ झाली असून एका तोळ्याचा दर 81903 रुपये आहे.
