लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतीत वाढ, चांदीने गाठला ‘एवढ्या’ लाखांचा टप्पा, सोन्याचे दर काय? जाणून घ्या…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ‘India Bullions’ च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी (10 फेब्रुवारी) चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 2.63 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ होऊन दर 1.58 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, ऐतिहासिक घसरणीनंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे दर घसरले. सिंगापूरमध्ये स्पॉट गोल्ड 0.5%ने घसरून $5,032.53 प्रति औंस झाले आहे तर चांदी 1.8% ने घसरून $81.92 वर आलीय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार, एप्रिलचा सोन्याचं कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट 0.2% ने वाढून 1 लाख 58 हजार 394 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता, जो सोमवारी (9 फेब्रुवारी) 1 लाख 58 हजार 066 रुपयांवर बंद झाला होता. मार्च महिन्यासाठीचा चांदीचं कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट Rs 2,62,745 प्रति किलोवर स्थिर होता.

शहरांनुसार विचार केला तर दक्षिण भारतातील शहरांमध्ये सोन्याचे दर देशात सर्वाधिक आहेत. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 158,820 रुपये असून तो देशात सर्वाधिक आहे. मुंबईत सोन्याचा दर 158,360 रुपये तर दिल्लीत 158,080 रुपये इतका दर आहे. कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्येही सोन्याचे दर 1.58 लाख रुपयांच्या पुढेच आहेत.

शहरानुसार सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

मुंबई – 158,360 रुपये
दिल्ली – 158,080 रुपये
बंगळुरू – 158,480 रुपये
चेन्नई – 158,820 रुपये
हैदराबाद – 158,610 रुपये
कोलकाता -158,150 रुपये

शहरानुसार चांदीचे दर (प्रति 1 किलो)

मुंबई – 263,270 रुपये
दिल्ली – 262,820 रुपये
बंगळुरू – 263,480 रुपये
चेन्नई – 264,040 रुपये
हैदराबाद – 263,690 रुपये
कोलकाता -262,930 रुपये

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!