सोन्या -चांदीच्या झटक्यात बदलल्या किमती;24k, 22k चा आज किती आहे भाव?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज 14 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय बाजारात सोन्या -चांदीच्या दरात मोठा फेरबदल झाला आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 600 रुपये तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

जीएसटीसह आज 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 1 किलो चांदीची किंमत आजच्या दिवशी 2 लाख 62 हजार 650 रुपये इतकी झाली आहे. सोन्या-चांदीच्या सातत्याने वर खाली होणाऱ्या किंमती बाजारभावानुसार दिल्या आहेत.

दरम्यान आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,56,500 रुपये तर 1 किलो सोन्याचा भाव 1,56,50,000 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 1,43,458 रुपये आणि 1 ग्रॅमसाठी 1,43,45,833 रुपये आहे. चांदीचा भाव 999 रुपये असून 1 किलो चांदीचा भाव 2,46,020 रुपये आहे.

ऐन लग्नसराईत सोन्या चांदीच्या दरात चढउतार होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!