Gold And Silver Prices : आज सोनं-चांदीच्या कितमीत मोठे बदल, जाणून घ्या…


Gold And Silver Prices : सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने चढउतार सुरूच आहेत. गेल्या वर्षभरातील विक्रमी तेजीनंतर आता दोन्ही मौल्यवान धातूच्या भावात किंचित नरमाई दिसून येत आहे, मात्र अजूनही किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे.

आज मंगळवारी पुन्हा सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात १०० रुपये किलोची घसरण झाली आहे. नवीन दरांनंतर सोन्याचा भाव ६२००० रुपयांच्या पुढे गेला आहे तर चांदीचा भावही ७५००० रुपयांच्या वर ओलांडला आहे.

सराफा बाजाराने मंगळवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, २० फेब्रुवारी रोजी, २२ कॅरेट सोन्याचा भाव ५७,६१० रुपये, २४ कॅरेटचा भाव ६२,८३० रुपये आणि १८ कॅरेटचा भाव ४७,१४० रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर १ किलो चांदीची किंमत ७५९०० रुपये आहे.  Gold And Silver Prices

मोठ्या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत…

आज मंगळवारी २२ कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव ५७,६१०/- रुपये, तर मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव ५७,४६०/- वर ट्रेंड करत आहे. तर पुण्यात सोन्याचा भाव ५७,४५० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत..

आज मंगळवारच्या २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोललो तर आज दिल्ली, सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याची ६२, ८३०/- रुपये तर मुंबई सराफा बाजारात किंमत ६२,६८०/- रुपये, तर पुण्यात सोन्याचा भाव ६३,७१९ रुपये आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!