पहिल्यांदाच परदेशात जाताय? ‘या’ गोष्टी न विसरता करा! येऊ शकते अडचण, जाणून घ्या…


Traveling : परदेशी ट्रिपला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण जर तुम्ही पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जात असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदाच परदेशी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा अनुभव आनंददायी असला तरी योग्य तयारी न केल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

परदेश दौरा सुरळीत आणि आनंददायी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. पासपोर्ट आणि व्हिसाशी संबंधित कागदपत्रांची अचूक माहिती ठेवणे, तेथील चलन आणि खर्चाचे नियोजन करणे, कायद्याचे ज्ञान असणे आणि संस्कृती समजून घेणे यामुळे तुमचा प्रवास सोपा होऊ शकतो.

परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…

पासपोर्ट आणि व्हिसा..

परदेश प्रवासासाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. या कागदपत्रांची सॉफ्ट आणि हार्ड कॉपी दोन्ही सोबत ठेवा. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पासपोर्टची प्रत वेगळी ठेवा.

परदेशी चलन आणि खर्चाचे नियोजन..

परदेशी चलन मिळवण्यासाठी अधिकृत विनिमय केंद्र किंवा बँकेचा वापर करा. रोख पैसे आणि डेबिट/क्रेडिट कार्ड यांचे संतुलित नियोजन करा. कोणत्या देशात कोणते चलन लागते, त्याचा विनिमय दर काय आहे, हे प्रवासाच्या आधी तपासा.

योग्य रिसर्च करून प्रवास ठरवा..

कोणत्याही देशात जाण्यापूर्वी त्या ठिकाणाविषयी माहिती मिळवा. तेथील नियम, कायदे, स्थानिक संस्कृती समजून घ्या. त्या देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळे, हॉटेल्स, रस्ते, वाहतूक व्यवस्था याबद्दल माहिती असणे फायद्याचे ठरते.

मोबाईल नेटवर्क आणि चार्जिंग व्यवस्था..

प्रत्येक देशात प्लग प्रकार वेगळे असतात, त्यामुळे युनिव्हर्सल अडॅप्टर आणि पॉवर बँक सोबत ठेवा. मोबाईलसाठी आंतरराष्ट्रीय रोमिंग किंवा स्थानिक सिमकार्ड घेण्याचा विचार करा.

बॅगेतील सामान मर्यादित ठेवा..

प्रवासादरम्यान सामान कमीत कमी ठेवा. अशा कपड्यांची निवड करा, जे विविध प्रकारे वापरता येतील. तसेच, परदेशात खरेदी करण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त वजन भरू नये.

वैद्यकीय विमा आणि आरोग्यविषयक खबरदारी..

परदेशात वैद्यकीय सुविधा महागड्या असतात, त्यामुळे ट्रॅव्हल इन्शुरन्स आवश्यक आहे. कोणत्याही आजाराची तक्रार असेल तर डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि आवश्यक कागदपत्रे बरोबर ठेवा. तिथले हवामान तुमच्या प्रकृतीला अनुकूल आहे का, हेही तपासून घ्या..

हवामान आणि कपड्यांची तयारी..

प्रवासाच्या आधी त्या देशातील हवामान तपासा आणि त्यानुसार कपड्यांची निवड करा. थंड हवामान असेल तर गरम कपडे आणि गरम हवामान असल्यास हलके व आरामदायी कपडे बॅगेत ठेवा.

प्रवासाच्या सोयी आणि राहण्याचे नियोजन..

फ्लाइट बुकिंग करताना वेळेची योग्य सांगड घाला. हॉटेल निवडताना त्याच्या सुविधांबाबत खात्री करा. कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्याआधी Google Maps किंवा स्थानिक ट्रान्सपोर्टची माहिती ठेवा.

स्थानिक भाषेचा थोडासा अभ्यास करा..

जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल जिथे इंग्रजी बोलली जात नाही, तर हॉटेलचा पत्ता स्थानिक भाषेत लिहून ठेवा. काही मूलभूत शब्द आणि वाक्ये शिकल्यास संवाद साधणे सोपे जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!