सोरतापवाडीत व्यावसायिक गोडाऊनला आग ; सव्वा कोटींचे साहित्य जळून खाक …!

उरुळी कांचन : पुणे -सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरातील एका व्यावसायिक संकुलातील गोडावूनला लागलेल्या भीषण आगीत सव्वा कोटी रुपयांचे साहित्य जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारी (ता. २५) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी हायड्रॉलिक पाईप हायड्रॉलिक मशीन ओईल फर्निचर जनरेटर व्ही बेल्ट काम्पुटर ss बेलओ होस कॅनव्हर बेल्ट होस बेल्ट आसा सर्व मुद्दे माल जाळून खाक झाला आहे.
सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात निखील रामदास चौधरी यांचे श्रीनाथ इंटरप्राइजेस नावाने गोडावून आहे. या गोडावून मध्ये हायड्रॉलिक पाईप, हायड्रॉलिक मशीन ऑईल, फर्निचर, जनरेटर, व्ही बेल्ट, विविध संघनक, बेलओ होस कॅनव्हर बेल्ट, होस बेल्ट आदि साहित्य या गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते.
मध्यरात्री अचानक दीड वाजण्याच्या सुमारास गोडावूनमधून धूर निघत असल्याचे पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ निखील चौधरी यांना सांगितली. त्यांनी गोडवूनजवळ येताच हि बाब अग्नी शामक दलाला कळवली. तोपर्यंत या आगीने गोडावूनला विळख्यात घेतले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अग्नी शामक दलाने गोडावूनकडे धाव घेतली तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. काही क्षणामध्येच आगीच्या विळख्यात सर्व एक कोटी २० लाख रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.