GN Saibaba Acquitted : नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणी जीएन साईबाबासह ५ जणांची निर्दोष मुक्तता, जन्मठेप केली रद्द…


GN Saibaba Acquitted : नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. जी.एन. साईबाबा यांची जन्मठेप रद्द करण्यात आली आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा यासह त्याच्या पाच सहकाऱ्यांचा अपिल अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजुर करत आता त्यांना मुक्त केले आहे.

त्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. सुनावणी वेळी युएपीए अंतर्गत कारवाईवेळी नियम पाळले गेले नसल्याचे ताशेरे ओढले.

जीएन साईबाबा यांच्यासह इतर चार आरोपी निर्दोष आहेत, असे निकालात न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारसह पोलीस दलाला खूप मोठा धक्का बसला आहे.साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणाहून पुरावे गोळा करताना डिजिटल पुरावे गोळा करत असताना नियमांचे उल्लंघन केले आहे असे न्यायालयाने म्हटलं आहे. GN Saibaba Acquitted

जीएन साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करता आले नसल्याने आता या आधारावर जी एन साई बाबा, महेश तिरकी, प्रशांत राही, हेम मिश्रा आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांना वर्ष २०१३ मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबांचा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले.

गडचिरोलीमध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबांच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे मिळून आल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर साईबाबाला पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, साईबाबाच्या घरातून मिळालेले साहित्य आणि डिजिटल पुरावांच्या आधारे पोलिसांनी साईबाबा जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचे काम करत असल्याचा आरोप ठेवला होता.

एवढेच नाही तर तो परदेशामध्येही नक्षलवाद्यांसाठी पाचनुभूती आणि समर्थक जोडण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी म्हटलं होतं. त्यामुळे साईबाबा विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!