मुलींनी साडी नेसावी नीटनेटकी
उरुळीकांचन : साडी नेसायला काही मुलींना नकोसे वाटत असते; पण एकदा जिने व्यवस्थित साडी नेसली असेल तिला ती नक्कीच आवडू लागते. साडी नेसताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ते पाहू या.
बहुधा महिला एका चांगल्या साडीसोबत स्टायलिश मॅचिंग ब्लाऊज बनवून निश्चिंत होतात. त्यांना वाटते साडी त्यांना गर्दीत उठावदार दर्शवील; पण साडी नेसल्यानंतर मनाजोगा लुक न आल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.
साडी कितीही सुंदर, महागडी असली तरी परकराचे फिटिंग व फॅब्रिककडे लक्ष दिले नाही, तर सारा लुक बिघडतो. यासाठी साडीचा परकर नेहमी स्लीम-फिटच घ्या. जेणेकरून साडी त्यावर चापूनचोपून बांधता येऊ शकेल. यामुळे फिगरही स्लिम वाटू लागते. याशिवाय नेट वा पातळ कापडाच्या साडीसोबत सॅटिन वा शिमरचा परकर घ्यावा. सिल्क व कॉटन साडीसोबत इतर कोणत्याही फॅब्रिकचा परकर चालू शकतो.
*पिन अपकडे लक्ष द्या :* पहिल्यांदाच साडी नेसत असाल, तर ती पिनअप करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. कारण साडी नेसून चालणे, उठणे वा बसणे जरा कठीण असते. पदरापासून प्लेट्सपर्यंत सर्व जागी व्यवस्थित सेफ्टीपिन्स लावणे आवश्यक असते. जेणेकनीटनेटकीरून पदर इकडेतिकडे सरकणार नाही आणि साडीच्या प्लेट्सही खराब होणार नाहीत. यासाठी साडी नेसताना सेफ्टीपिन्स व्यवस्थित लावणे आवश्यक असते.
*ब्लाऊजने वाढवा शान :* कितीही महागाची व सुंदर असली तरी साडी ब्लाऊज तिला साजेसा नसेल, तर तिची चमक फिकी पडेल. तसेही पहिल्यांदाच साडी नेसत असाल, तर ब्लाऊजकडे लक्ष द्यावे. जेणेकरून तो घालून आपण सहज आणि आरामदायक राहू शकाल. इतरांचा ब्लाऊज अल्टर करून घालण्याऐवजी स्वतःच्या फिटिंगचा ब्लाऊज बनवावा. यासोबतच ब्लाऊजची उंची व गळ्याचे डिझाइन आपल्याला कंफर्ट वाटेल असेच ठेवावे. तसा आपल्याला हवा तर आपण आपला एखादा क्रॉप टॉप वा स्टायलिश शर्टही ब्लाऊजऐवजी घालू शकता.
*फॅब्रिककडेही लक्ष द्यावे :* सिल्क आणि कांजीवरम साड्यांसारख्या साड्या दुसऱ्या नाहीत; पण पहिल्यांदाच नेसताना त्या सांभाळणे अवघड जाते. साडीचे फॅब्रिक जेवढे जास्त हलके असेल तेवढी ती सांभाळणे सोपे होईल. यासाठी पहिल्यांदा नेसण्यासाठी नेट, जॉर्जेट वा शिफॉनच्या साडीचीच निवड करावी.
*या टिप्स पडतील उपयोगी*
– साडीसोबत घालण्यासाठी फुटवेअर नेहमी आरामदायकच निवडावे. जेणेकरून त्यात साडी अडकणार नाही.
– आपल्याला मोकळा पदर कॅरी करणे कठीण वाटत असेल, तर तो व्यवस्थित पिनअप करून घ्यावा.
– ज्वेलरी कमी वापरावी, जेणेकरून ती साडीत अडकणार नाही.
– टोकदार वा लटकनचे इयररिंग्ज व बांगड्या घालू नयेत. ते साडीत अडकण्याची शक्यता असते.
– साडी आपल्या देहयष्टीनुसार कंबरेवर योग्य जागी बांधावी. यामुळे तिचा लुक खुलून दिसेल.
– नेहमी ब्लाऊजच्या मॅचिंगची व योग्य फिटिंगची इनरच वापरावी. जेणेकरून ब्लाऊज फिटिंगला योग्य बसू शकेल.
– साडीवर जास्त वर्क नसावे. पहिल्यांदा जास्त वर्कची साडी नेसणे सावरणे कठीण जाऊ शकते.
– एखादी मोठी हँडबॅग घेण्याऐवजी स्लिम बॅगच कॅरी करावी. जेणेकरून मोबाइल आणि इतर छोट्या- मोठ्या वस्तू त्यात ठेवून आपण मोकळेपणाने फिरू शकाल.
– काही वेळा साडी नेसताना तिच्या प्लेट्स व्यवस्थित होत नाहीत. यासाठी आपण हवे तर साडी नेसण्यापूर्वीच सेफ्टी पिनच्या मदतीने त्या प्लेट्स बनवू शकता.