काय सांगता! ‘या’ ठिकाणी मुली लग्न करायला तयार नाहीत, कारण वाचून उडेल झोप….

नवी दिल्ली : लग्न हे पवित्र बंधन मानलं जातं. यामध्ये दोन लोक रीतीरिवाज, कायदेशीर नियम आणि अधिकारांसह एकत्र राहण्यास सहमती दर्शवतात. मात्र आजकाल लोकांचा लग्नावरुन विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न करणं टाळतात. लग्न न करण्याच्या देशांमध्ये जपानच्या तरुणी आघाडीवर आहेत. यामागं काय कारण आहे हे जाणून घेऊया.
टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जपानच्या सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थिनी युना काटोला संशोधनात करिअर करायचं आहे, परंतु तिचं लग्न झालं आणि मुलं झाली तर तिचं करिअर संपेल असं तिला वाटतं.
काटोच्या म्हणण्यानुसार, करिअर संपण्याच्या भितीनं अनेक मुली लग्न करत नाहीत.देशातील जन्मदर नकारात्मक झाला आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी सरकार तरुणांना लग्न करण्यासाठी आणि अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
दरम्यान, जपानमध्ये प्रथमच सरकारने STEM अभ्यासक्रमांमध्ये मुलींसाठी कोटा निश्चित केला आहे. हे जपानी समाजासाठी पूर्णपणे नवीन असेल, कारण आतापर्यंत या क्षेत्रांमध्ये मुलांना महत्त्व दिले जात होते.