‘घोडगंगा’ चालू करण्याचा माझा शब्द, पण माऊली कटकेंना निवडून देण्याचा तुमचा शब्द खरा करा ! २३ तारखेला माऊली कटके विजय होतील ,अजित पवार यांनी सांगून टाकले भाकित ….!!


उरुळीकांचन : शेतकऱ्यांशी निगडीत सर्व निर्णय घेण्यासाठी मी वचनबद्ध असणार असून पुढील काळात कांदा निर्यात निर्णय, दूध दरवाढ , ऊसाला रास्त भाव मिळून देण्यास आमची बांधिलकी कायम असणार आहे. सरकार कायम राहणार असून तुम्ही साथ दिली तर आणखी चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात काम करण्यास मदत मिळणार आहे. या तालुक्यातील ‘घोडगंगा’ कारखान्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे’एनसीडीसी’ कडून अर्थिक सहाय्यता मिळून घोडगंगा कारखाना चालू करण्याचा माझा शब्द तुम्ही पण माऊली कटकेंना विजयी करुन आम्हाला साथ द्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

 

 

शिरूर -हवेली विधानसभा मतदार संघातील महायु‌तीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त न्हावरे(ता.शिरूर) येथे रविवारी (ता.17) आयोजित जाहीर सभेचे अजित पवार हे बोलत होते. यावेळी सभेला विराट गर्दीचे स्वरूप आले होते.यावेळी सभेला माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, प्रदीप गारटकर, दिलीप वाल्हेकर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, दादा पाटील फराटे, राजेंद्र जासूद, रवींद्र काळे, मोनिका हरगुडे, सुधीर फराटे, संदीप भोंडवे, प्रशांत काळभोर , चित्तरंजन गायकवाड, प्रवीण काळभोर, विलास कुंजीर, आण्णा महाडीक ,जितेंद्र बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

अजित पवार म्हणाले, आम्ही राज्य सरकार म्हणून जिल्ह्यात काम करताना सर्व भागात समान विकास झाला पाहिजे या तत्वाने काम करीत आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वाहतुक असलेले रस्ते ,उड्डाणपूल व प्रशासकीय व्यवस्था चांगली राहण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. शिरुर तालुक्यातील एमआयडीसी -३ चा विस्तार करण्याचा विषय असो की, तरुणांना त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळण्याचा विषय असो त्या माध्यमातून काम सुरू आहे. शिरुर तालुक्यातील शेती सिंचनासाठी चासकमान , डींभे धरणाचे आवर्तन असून योग्यरितीने मिळावे असे आमचे प्राधान्य आहे. हवेली तालुक्यात यशवंत कारखान्याचा प्रश्न बाजार समितीनेजमीन खरेदी करुन पूर्ण करण्याचा प्रयत्न असून घोडगंगातही केंद्राकडून अमित शाह यांच्याशी बोलुन कारखान्याला एनसीडीसी कर्ज मिळून देऊन कारखाना सुरू करणार असल्याचे सांगून त्यांनी आमच्या विचारांच्या माऊली कटके यांना संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

 

मुलाचे अपहरणाचे राजकीय भांडवल केले  !

अजित पवार यांनी या सभेत आ. अशोक पवार यांचा मुलगा ऋषी पवार यांच्या अपहरणातील तपासातील संपूर्ण किस्सा सभेत मांडून अपहरणाचे राजकीय भांडवल कसे केले हे भरसभेत ऐकून दाखविले. ते म्हणाले हा मुलाचा आपल्या सहकाऱ्यासोबत घरी जाऊन आपल्या पक्षात काही कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याने त्याचा घरी गेला असताना पैश्याच्या अपेक्षेने त्याच्याच सहकारी कार्यकर्त्यांने हे कुंभाड रचले. वास्तविक त्याचा कार्यकर्ते बँकेचा कर्जबाजारी असल्याने अपहरणातून काही खंडणी मिळेल म्हणून त्याने हा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचे वडील यांनी अपहरणाचे राजकीय भांडवल करुन विरोधी उमेदवारांना बदनाम करण्याचा केविलवाणा डाव केला. त्याच्यात कटकेंचे कार्यकर्ते तेथे होते. असे सांगून भावनिक मुद्दा केला. लोकांची मते मिळविण्याकरता काही लोक इतक्या खालच्या थराला जात असतील हे दुर्दैव आहे. मी स्वतः हा या प्रकरणाची नि: पक्षपाती चौकशी करुन कोणीही दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र भावाकीने माऊलीवर चांगलाच डाव रचल्याचे ते म्हणाले.

 

अमोल कोल्हे आणि निष्ठा मोठा विरोधाभास !

खा. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत विजय मिळाल्यानंतर माझ्यावर मोठा राग आवळण्यास सुरुवात केली आहे. माझे जाकीट गुलाबी , गुलाबी थिम त्यांना चांगलीच नजरेत भरली आहे त्यांनी आता निष्ठेचा गोष्टी मला सांगण्यास सुरुवात केली आहे.ते प्रथम मनसे, शिवसेना असा प्रवास करुन राष्ट्रवादी आले.शिवसेनेच्या वर्धापन दिनात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पूर्ण संपवूया असे म्हणाले होते. ते आता माझ्यावर निष्ठेचा टिका करीत आहे.

 

माऊलीच्या प्रतिसादाने भावकी झोपणार नाही !

आज झालेल्या सभेचे चित्र पाहिल्यास भावकी काही झोपणार नाही कोपरखळी अजित पवार यांनी सभेत लगावली.परंतु भावकी शेवटच्या दिवसांत तरबेज असल्याचे सांगून आता त्यांच्याकडे ‘घोडगंगा’ चे कामगार काम करण्यासाठी येणार नाही. परंतु ते आता व्यंकटेश कृपाचे कामगार तुमच्याकडे पाठवतील त्यामुळे तुम्ही जागे राहून काम करा अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी लगावली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!