Ghatkopar Hoarding Falls : पावसामुळे त्यांनी पेट्रोल पंपाचा आसरा घेतला, अचानक जाहिरातीचे होर्डिंग कोसळले, १४ जणांचा नाहक जीव गेला, जबाबदार कोण? अनेकजण गंभीर जखमी…
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले.
जाहिरातीच्या होर्डिंगमुळे घाटकोपर मधील झालेल्या दुर्घटनेत तब्बल १४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे समोर आले असून, अजूनही काही जण अत्यवस्थ आहेत. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
तसेच घाटकोपरच्या या होर्डिंगच्या दुर्घटनेत पंतनगर पोलिसांनी पेट्रोल पंपाचा मालक भावेश भिडे आणि ज्या जाहिरात कंपनीचं हे होर्डिंग होतं त्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी ही घटना घडली. सोमवारी दुपारी जे वादळ आले, त्या वादळी वाऱ्यात घाटकोपर मधील भावेश भिडे यांच्या पेट्रोल पंपावर लावलेले होल्डिंग कोसळले. १२० फूट बाय १२० फूट एवढ्या आकाराचे हे होर्डिंग होते, ज्यावेळी हे होर्डिंग कोसळले तेव्हा पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी 80 वाहने आली होती.
काही जण फक्त आश्रयाला आले होते तर काहीजण पेट्रोल भरण्यासाठी आले आणि जीव गमावून बसले. अजूनही ४३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर ३१ जणांना उपचार करून दवाखान्यातून सोडले आहे. Ghatkopar Hoarding Falls
हे होर्डिंग सरकारी जागेत होते आणि ती बेकायदेशीर होते असंही सांगितलं जात असून होर्डिंग कोसळल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात करताना या ठिकाणी सीएनजी पंप आणि डिझेल व पेट्रोलची साठे असल्यामुळे गॅस कटर वापरता आला नाही.
दरम्यान, या घटनेत तब्बल १४ जणांना जीव गमवावा लागला यामध्ये एकट्या राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान १३ जणांचा मृत्यू झाला, तर सायन रुग्णालयात एका जणांचा मृत्यू झाला.
राज्य सरकारने मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून पेट्रोल पंपाच्या मालकाविरोधात आणि जाहिरात कंपनी विरोधात पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.