चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून अशा प्रकारे मिळवा मुक्ती, जाणून घ्या..
पुणे : चेहऱ्यावरील छोटे छोटे केस अनेक महिलांसाठी समस्या असते. हे केस हार्मोन वाढल्यामुळे येत असतात. या केसांच्या समस्येपासून सुटका करून घेण्याचे काही घरगुती उपाय येथे देत आहोत.
हळद : हळद थोड्याशा पाण्यात मिसळून पेस्ट बनवून घ्यावी. नंतर ती चेहऱ्यावर केस जास्त असलेल्या जागी लावावी. ती थोडावेळ तशीच ठेवून वाळू द्यावी. नंतर एक कपडा गरम पाण्यात हलकासा बुडवून चेहऱ्यावर लावावा. यामुळे आपल्याला नकोशा वाटणाऱ्या केसांपासून मुक्ती मिळेल.
उटणे : दही व मलई हळदीत मिसळून उटणे बनवून जवाच्या पिठात बेसन पेस्ट व हळद मिसळून बनवून घ्यावी. चेहऱ्याच्या हनुवटीवर व ओठांच्या वर ती लावावी. थोड्यावेळाने ती सुकल्यानंतर पाण्याने धुवावी.
घरीच बनवा वॅक्स : एक चमचा साखर घ्या. त्यामध्ये थोडासा मध व लिंबाच्या रसाचे थोडेसे थेंब मिसळा. हे मिश्रण तीन मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये चेहऱ्यावर लावावे. ठेवा थोड्या वेळानंतर ते कोमट करून चेहऱ्यावर लावा. व कपड्याच्या साहाय्याने खेचून घ्या.
अंड्याचा मास्क : अंड्याच्या पांढऱ्या भागात एक चमचा साखर व मक्याचे पीठ मिसळा. आता ही पेस्ट एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावून ठेवा. दहा-पंधरा मिनिटांनंतर जेव्हा हा मास्क आपण उतरवाल तेव्हा केसही निघून जातील.
आता कॉस्मेटिक्सची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स
• लिपस्टिक नेहमी थंड व ओलाव्याच्या ठिकाणी ठेवणे फायद्याचे असते. सीलबंद क्रीम वा लोशन फ्रिजमध्ये ठेवायला हवे.
• सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यापूर्वी हात साफ करायला हवेत. कारण जेव्हा आपण क्रीम वा लोशन तळ- हातावर घेत असतो तेव्हा घातक जंतू क्रीम वा लोशनमध्ये जात असतात.
• बाटली, डबा इ. ची झाकणे नेहमी लावून ठेवावीत. विशेषतः ती सुगंध व अल्कोहल मिश्रित असतील तेव्हा हे जरुरी आहे.
• सूचनेविना सौंदर्यप्रसाधनात पाणी मिसळू नये. पाणी मिसळल्याने त्या उत्पादनाचा पीएच बॅलन्स बिघडेल व त्यातील प्रिझव्हेटिव्हज निकामी होतील.