लागा तयारीला! बुधवारपासून आचारसंहिता, 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान तर महापालिका..; मोठ्या नेत्याने तारीखच जाहीर केली…


पुणे : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी थेट तारीख जाहीर केले आहे. पाच नोव्हेंबर रोजी राज्यात निवडणुका जाहीर होतील असा अंदाज वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 5 नोव्हेंबर रोजी नगरपालिका,नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील. तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद,पंचायत समिती मतदान होईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होतील. 15 जानेवारी मतदान होईल आणि 31 जानेवारी सर्व निवडणुका पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करत वळसे पाटसांनी निवडणूकांचे वेळापत्रकच जाहीर केले आहे.

राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत.
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील.’. दरम्यान, वळसे पाटलांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामळे आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!