Gautami Patil : मुंबईत गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा तुफान राडा! तरुणाला चोपले, दहीहंडीत नेमकं काय घडलं.?


Gautami Patil मुंबई : सध्याच्या घडीला गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमी पाटीलने (Gautami Patil) आजवर महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. परंतु काल दहीहंडी उत्सवानिमित्त पहिल्यांदाच मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाली होती. यावेळी मुंबईकरांनी देखील तीच चांगलेच स्वागत केले आहे.

यामध्ये गौतमी पाटीलची क्रेज फक्त गावापुरतीच मर्यादित नसून मुंबईसारख्या मोठ्या शहरातही गौतमीची क्रेज कायम असल्याचे दिसून आल आहे. मात्र आपल्याला तर माहीतच आहे गौतमी पाटीलचा (Gautami Patil)  कार्यक्रम आणि राडा हे समीकरण काही नवीन नाही.

ते ठरलेलेच आहे गौतमी पाटीलच्या (Gautami Patil)  कार्यक्रमात कायमच राडा होतो. सध्या देखील काल दहीहंडी उत्सवात गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे

तिच्या कार्यक्रमाच्यावेळी गौतमीचा डान्स करत असताना एक तरुण स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला पब्लिकने अडवले मात्र तो ऐकायला तयार नव्हता तो स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या पब्लिकने त्याला त्याच ठिकाणी चांगला चोप दिला आहे.

त्यामुळे काही वेळ कार्यक्रमामधील वातावरण देखील तंग झाले होते. मात्र तेवढ्यात पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करत त्या तरुणाला कार्यक्रमातून बाहेर काढले आणि पुढील कार्यक्रम सुरू झाला.

दरम्यान, मागच्या काही दिवासांपासून गौतमी पाटीलचे कार्यक्रम कमी झाले होते. आता दहीहंडीपासून राज्यभर पुन्हा कार्यक्रम सुरु होत आहेत. गौतमी पाटीलला (Gautami Patil) बघण्यासाठी मुंबईमध्ये (Mumbai) मोठी गर्दी झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!