गौतमी पाटीलचे इंदुरीकर महाराजांच्या मानधनावरील टीकेला एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाली…

पुणे : महाराष्ट्रात सध्या कला आणि अध्यात्मिक क्षेत्रात संमिश्र घुसळण सुरु आहे. एका बाजूला किर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज तर दुसऱ्या बाजूला डान्सर गौतमी पाटील . इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून वापरत असलेली भाषा आणि गौतमी पाटील ही आपल्या नृत्यातून करत असलेले हावभाव यांवरुन अनेकदा वाद निर्माण होतात.
तत्पूर्वी, इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलवर टीका करताना म्हंटल होतं की , गौतमी पाटीलच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते, पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही फक्त ५ हजार रुपये वाढवून मागितले तर आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप करतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिले जाते. आम्हाला संरक्षण नसते.
दरम्यान ,आता इंदुरीकर महाराज्यांच्या या टीकेवर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. ”इंदुरीकर हे एक महाराज आहेत, त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. तसेच इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं.” मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. मला तीन गाण्यासाठी कोणीही तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्टपणे सांगितले आहे.
‘आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही’. असेही गौतमीने सांगितले आहे.
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक नर्तकी आहे. जी तिच्या लावणी नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. लावणी हा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. मात्र, या नृत्यप्रकारात तिने इतरही काही गोष्टी अंतर्भूत केल्या. परिणामी तिच्यावर अश्लिलता आणि कलेला गालबोट लावल्याचाही आरोप झाला. यांनतर गौतमी चांगलीच प्रसिध्दीच्या झौतात आली आहे. तरुणाईवर तिने चांगली जादू केली आहे. तिच्या आदांवर फिदा होणार लाखो चाहते तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.