गौतमी पाटीलच्या गाडीचा पुण्यात धक्कादायक अपघात, रात्री नेमकं काय घडलं?


पुणे : लाखो तरुणांच्या हद्रयावर राज्य करणारी डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील हिच्या वाहनाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात घडला. यात एका रिक्षाला मोठा धक्का बसला असून रिक्षाचालक जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ३० सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजता वडगाव पुलाजवळ झाला. महामार्गावरील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या गाडीने मागून धडक दिली.

       

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. धडक झाल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सिंहगड रोड पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.

सध्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात त्याने मद्यप्राशन केले होते का, हे तपासले जाणार आहे. त्यासाठी चालकाची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!