Gautami Patil : माझ्या प्रत्येक कार्यक्रमात भांडण, गोंधळ…; बारामतीत गौतमी पाटीलचे मोठे वक्तव्य


Gautami Patil  बारामती : डान्सर गौतमी पाटील सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असतो. तिच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ होत असतो. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. तिचे लाखो चाहते आहेत. फक्त तरुणच नाही तर तिचे कार्यक्रम सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. (Gautami Patil)

आता तिच्या कार्यक्रमात जेव्हा गडबड, गोंधळ किंवा तत्सम जे प्रकार घडतात त्यावर भाष्य केले आहे. गौतमी पाटीलने (Gautami Patil) बारामती (Baramati) या ठिकाणी एक कार्यक्रम केला. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिला गडबड आणि गोंधळाविषयी विचारण्यात आले तेव्हा गौतमी पाटीलने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती (Baramati) तालुक्यातल्या झारगडवाडी या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे. आज झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन चांगले होते. कार्यक्रम खूप छान पार पडला. भांडण किंवा मारामारी आजच्या कार्यक्रमात काहीही घडले नाही. मला नियोजन खूपच आवडलं.

माझा कार्यक्रम म्हटलं की गडबड आणि गोंधळ, मारामारी असे होते असंच सांगितले जातं. मात्र माझ्या सगळ्याच कार्यक्रमात भांडण, मारामारी असे काही प्रकार होत नाहीत. पण काय होते त्यावरुनच टार्गेट केले जाते .

मात्र माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असे घडत नाही. याआधी जी बातमी समोर आली होती तो माझा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे तसं घडले. मात्र प्रत्येक कार्यक्रमात असे घडत नाही.

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे पार्थ पवार युथ फाउंडेशन दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. मेखळी येथील भैरवनाथ दहीहंडी संघाने येथील दहीहंडी फोडली.

झारगडवाडी येथील कार्यक्रमात अतिशय शिस्तबद्ध नियोजन असल्याने माझ्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ झाला नाही यामुळे आयोजकांचे नियोजन मला आवडले असल्याचे गौतमी पाटील हिने सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!