दादा मला माफ करा ! गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी..!


पुणे : सध्या राज्यात नृत्यांगना गौतमी पाटील चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठे वक्तव्य केले होते. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी दिली होती.

यावर आता गौतमीने दादांना उद्देशून आवाहन केले आहे. ती म्हणाली, आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केली आहे. तरीही काही ट्रोलर्स ट्रोल करत असतात. दादा खूप मोठे आहेत. दादांना मी काही बोलू शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे. मी माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या.

तरीही अजूनही लोक मला ट्रोल करीत आहेत. ते कोण आहेत, हे मला माहिती नाही. लोक माझे जुने व्हीडिओ टाकत आहेत. माझी प्रसिद्धी काहींना पहावत नाही, असेही तिने म्हटले आहे.

राष्ट्रवादीकडून गौतमी पाटीलच्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचे आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार आली होती. यावर अजित पवार यांनी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!