Gautam Adani : मोठी बातमी! गौतम अदानी अडचणीत, अदाणींवर २५० दशलक्ष डॉलरची लाख प्रकरणाचा आरोप..


Gautam Adani : भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन न्यायालय आणि नियामकाने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावरील हा आरोप कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल आहे.

अमेरिकेच्या तक्रारदारांनी अभियोगकांनी गौतम अदानी आणि त्यांच्या सहयोंगीवर २५० दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी (ता. २० नोव्हेंबर ) न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे अदानी समुहाच्या जागतिक प्रतिष्ठेवर मोठा धक्का बसला आहे.

एसईसी ही भारतीय सेबीप्रमाणं गुंतवणुकदारांचे हितरक्षण करणारी अमेरिकेची सरकारी संस्था आहे. या संस्थेनं अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आणि अझूर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कॅबनेस यांच्यावर सिक्युरिटीजची फसवणूक आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. Gautam Adani

तसेच अमेरिकन गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय यांच्याकडून निधी मिळविण्यासाठी अदानींकडून खोटी आणि चुकीची माहिती दिल्याचं आरोपामध्ये म्हटले आहे. भारत सरकारनं अदानींच्या कंपन्यांना अब्जावधी डॉलरचे प्रोजक्ट दिले आहेत. या कंपन्यांना भांडवल मिळविण्यासाठी लाचखोरीची योजना आखण्यात आली होती, असा एसईसीनं दावा केला.

दरम्यान, या आरोपांचा परिणाम अदानी समूहाच्या गुंतवणूक योजनेवर होण्याची शक्यता आहे. अदानी समुहाने नुकतेच 20 वर्षांसाठी हरित ऊर्जा डॉलर्स बॉंड विक्री केली होती, जी गुंतवणूकदारांकडून जास्त प्रतिसाद मिळाल्याने यशस्वी झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!