अनंत गर्जेंच्या घरासमोरच गौरीचा अंत्यसंस्कार, वडिलांनी फोडला टाहो; म्हणाले, तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू….


मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. शनिवारी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर आज अखेर त्यांचे पार्थिव मूळगावी आणण्यात आले.

मात्र अंत्यसंस्काराच्या वेळी दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला आणि एकवेळ परिस्थिती गंभीर झाली. गौरीचे पार्थिव मोहोज देवढे येथे पोहोचताच माहेरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार गर्जे यांच्या घरासमोर करण्याचा आग्रह धरला.

गौरी पालवे-गर्जे हिच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार व्हावेत, असा आग्रह धरला होता. यावरुन गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची देखील झाली.

       

मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ.गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांसमोर हात जोडत “जर तुम्हाला मुलगी असेल, तर मला न्याय द्या. श्रीमंताला मुलगी देऊ नका. त्यांच्या नादी लागू नका, गरिबाला मुलगी द्या, असे म्हणत टाहो फोडला. त्यांच्या या आक्रोशाने सगळेच जण सुन्न झाले होते.

दरम्यान, यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थीनंतर अनंत गर्जे यांच्या दारात अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचून डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौरीच्या आईवडिलांना हंबरडा फोडला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!