गॅस टंचाई केली अडचण, आता शेणाच्या गोवऱ्यांना सोन्याचा भाव, होतेय तुफान विक्री…

मुंबई : सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे लोकं हवालदिल झाले आहेत. इराणवर इस्रायल-अमेरिकेने चढवलेलला हल्ला., त्यानंतर युद्धाला फुटलेलं तोडं, याला आज 15 दिवस उलटून गेले आहेत. पण तीन देशांच्या या युद्धाच्या अख्ख्या जगाला फटका बसत आहे. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्राही गॅसची टंचाई असून लोकं पॅनिक झाले आहे.

गॅसऐवजी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या यांचा वापरक करत आहेत. मोठे व्यवसाय, हॉटेल मालक यांनाही सिलेंडरचा तुटवडा भासत असून अनेकांनी चुलीकडे मोर्चा वळवला. यामुळे आता शेणाच्या गोवऱ्यांना मागणी वाढली आहे. जळगावात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने म्हशीच्या तसेच गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांची विक्री वाढली आहे.
व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले असून चूल पेटवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. यामुळे शेणाच्या गोवऱ्यांचा भाव वाढला आहे. गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागात याचा आधीपासूनच वापर होत आहे.

लाकडांमुळे धूर होत असल्याने त्याला पर्याय म्हणून, तसेच चूल लवकर पेटण्यासाठी शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. 7 रुपये तसेच 10 रुपयाला एक याप्रमाणे गवऱ्यांची विक्री होत असून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शेणापासून तयार होणाऱ्या गवऱ्यांना चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दिवसभरात महिला मजुरांच्या माध्यमातून 600 ते 700 गोवऱ्या तयार केल्या जात असून त्यापैकी किमान 500 गोवऱ्यांची रोज विक्री होते. घरगुती वापराबरोबरच तसेच हॉटेल व्यवसायिकांकडून मागणी वाढली असून एक दिवस आधीच बुकिंग करून गोवऱ्या घेऊन जात आहेत. यामुळे अनेकजण बनवत देखील आहेत.