पुणे -मुंबई महामार्गावर गॅस गळती वाढली; तब्बल 21 तास वाहतूक ठप्प…


पुणे : पुणे- मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी गॅस टँकर पलटी झाला. टँकर उलटल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. टँकरमधून गॅस लिकेज होऊ लागला आहे. त्यामुळे एक्सप्रेस हायवेवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तब्बल 21 तास वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,आडोशी बोगदा परिसरात प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, आडोशी बोगदा ते उर्से टोल नाक्यापर्यंत ही पन्नास किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेला तब्बल 21 तास झाले तरी वाहतूक सुरू झाली नसल्याने अनेक वाहनचालक या वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत.

दरम्यान गॅस गळतीचे प्रमाण नियंत्रणात येईपर्यंत आणि महामार्ग पूर्ववत सुरू होईपर्यंत वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना ताम्हिणी घाट मार्गे मुंबई तसेच कर्जत मार्गे ठाणे या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एनडीआरएफ टीम, हेल्प फाउंडेशन तसेच बीपीएल टीम घटनास्थळी कार्यरत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक कोंडी आणखी काही तास कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!