सामान्यांना दिलासा ! गॅस सिलेंडरच्या किमती होणार कमी ; कधी पासून होणार निर्णय ….
Gas Cylinder Price : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. मात्र सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळणार असे चित्र तयार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
तेल विपणन कंपन्या एक ऑक्टोबर 2024 पासून एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरम्यान हा सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. आगामी निवडणुका पाहता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे. तथापि या संदर्भात सरकार कडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यामुळे सरकार सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढील महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती कमी करणार का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.