Gas Cylinder : दिलासादायक बातमी! पुढचे १० दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत, जाणून घ्या…

Gas Cylinder : लोकसभा निवडणूक जवळ येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसत आहेत. अशातच आता होळी सणाला १० दिवस उरले असून त्यानिमित्त सरकारतर्फे तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.

होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे योगी सरकार राज्यातील सुमारे १.७५ कोटी पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर देणार आहे. पुढील १० दिवस मोफत एलपीजी सिलेंडर देणार असल्याचे म्हंटले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
योगी सरकारच्या योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातून दोनदा सणांच्या निमित्ताने मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची योजना आहे. Gas Cylinder

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात सरकारने दिवाळीनिमित्त मोफत एलपीजी सिलिंडर दिले होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागेल. उज्ज्वला योजना पंतप्रधान मोदींनी २०१६ मध्ये सुरू केली होती.
यूपी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी २,३२१ कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १.७५ कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलिंडर रिफिल केले जात आहेत.
