४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरणारच होते, तेवढ्यात…! पुण्यात मोठा अनर्थ टळला
पुणे : पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही बँकेला आग लागली. या आगीत बँकेतील महत्वाची कागदपत्रे जळाली. परंतु अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे मोठा अनर्थ टळला.
अन्यथा पुणे शहर ४०० सिलेंडरच्या स्फोटाने हादरले असते. वाघोली येथील आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला आहे. वाघोलीत रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आग लागली.
याठिकाणी गोडाउनला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.
त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. परंतु या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारी ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. त्या ठिकाणांपर्यंत आग जाऊ नये, यासाठी नियोजन केले.
आगीवर वेळेतच नियंत्रण मिळवले. यामुले पुढील धोका टळला. अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे शहर हादरले असते. यामुळे या जवानांचे कौतुक केले जात आहे.