पुण्यात कचरा वाहतूक ठेकेदाराला तब्बल 9 कोटी 40 लाखांचा दंड, कारण…

पुणे : पुणे महापालिकेने कचरा वाहतूक करणार्या ठेकेदाराला 9 कोटी 40 लाखांचा दंड केला आहे. शहरात निर्माण होणारा व संकलित होणारा कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्त केली जाते.

याचे कारण म्हणजे रँपवरून आणलेला कचरा, डेपोमध्ये दिलेला कचरा, यामध्ये ताळमेळ नाही. तसेच कचरा वाहतूक करणार्या वाहनांना जीपीआरएस यंत्रणा नाही, त्यामुळे महापालिकेने हा दंड केला आहे.
या ठेकेदाराकडून कचरा वाहतुकीसाठी वाहने पुरविली जातात. कचरा वाहतूक करणार्या वाहनास जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. तसे निविदेमध्ये नमूद केलेले असते. या यंत्रणेमुळे संबंधित गाडीच्या किती फेर्या झाल्या हे समजून येते.

महापालिकेने कचरा वाहतुकीचे काम दिलेल्या स्वयंभू ट्रान्स्पोर्ट या ठेकेदाराच्या निविदा क्र. 209 पोटी दिलेल्या बिलाची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या लेखा विभागाकडे होते. या विभागाने 2016 ते ऑगस्ट 2021 पर्यंतच्या कालावधीतील 537 बिले तपासली.
बिलापोटी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला 93 कोटी 41 लाख बिल दिले आहे. मात्र किती फेऱ्या झाल्या, याचा ताळमेळ देखील नसल्याने हा निर्णय घेतला आहे.
