गांजाचे लोण आता खेडेगावात! चौफुला येथे ६३ हजार किंमतीचा गांजा जप्त करून चार जणांना बेड्या; यवत पोलिसांची कारवाई


दौंड : (ता. दौंड) येथील चौफुला बोरीपार्धी हद्दीतील पुणे सोलापूर महामार्ग लगत बंद असलेल्या बोरमलनाथ हॉटेलमध्ये साडेतीन किलोचा ६३ हजार किंमतीचा गांजा जप्त करून चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई यवत पोलिसांनी केली आहे.

भिमाबाई दत्तात्रय लकडे (वय ५६), राहुल दत्तात्रय लकडे (वय ३८), अतुल दत्तात्रय लकडे, जयश्री राहुल लकडे (सर्व रा. बोरीपार्धी चैफुला ता. दौंड जि. पुणे) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मुलांनो सावधान! बनावट नवरीने दीड वर्षात केले वीस मुलांशी लग्न, पुण्यातील मुलांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, चौफुला- बोरीपार्धी हद्दीतील बोरमलनाथ हॉटेलमध्ये गांजा साठा असून चोरट्या पद्धतीने विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी (ता.८) बोरमलनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला असता, तब्बल साडेतीन किलो वजनाचा व ६३ हजार किंमतीचा हिरवट रंगाचा गांजाचा साठा मिळुन आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड -जेजुरी पालखी मार्गाची पाहणी

दरम्यान त्यांच्यावर अमली पदार्थ, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे तपास करीत आहेत.

महसुलचा काळा कारभार उजेडात! पुणे विभागाचे अतिरिक्त महसुल आयुक्त अनिल रामोड लाच घेताना थेट सीबीआय कडून रंगेहाथ अटक

ही कारवाई यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रेखा वाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, उप पोलीस निरीक्षक विजय कोल्हे, पोलीस नाईक विकास कापरे, विशाल जाधव, राजू शिंदे, राहुल गडदे, अश्विनी देवडे आदींच्या पथकाने केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!