कुख्यात गुंड गजानन मारणेचा कारागृहातुन बाहेर येण्याचा मार्ग मोकळा…!

पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन मंजूर झाला आहे. पुण्यातील व्यावसायिकाला २० कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
शेअर मार्केटमध्ये ४ कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्याबदल्यात २० कोटी रुपयांची एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली सहा महिन्यांपूर्वी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या १४ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता. मात्र या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नसल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. गजा मारणेला जामीन मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस तपासात मारणेच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळून आलेला नाही. एका शेअर ट्रेडिंगमध्ये ४ कोटी रुपये गुंतविल्यानंतर त्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण केले होते. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी त्यावेळी गजा मारणे याच्यासह १४ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून गजा मारणेसह इतर साथीदार जेलमध्ये आहेत.
मात्र या प्रकरणात गजानन मारणे याला आता मोक्कातून वगळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोलले जात आहे. गजा मारणेवर पुणे पोलिसांची मेहनरजर असल्याचं समोर येत आहे. मात्र, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मारणे याला मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांनी १६९ चा अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे एकच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात मारणे विरोधात पुरावे नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गजा मारणे याचा कारागृह बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करू, असे मारणे याचे वकील विजय ठोंबरे यांनी सांगितले आहे.