पिंपरीत पुन्हा टोळीयुद्ध! तरुणावर तलवार, कोयत्याने वार, उडाली खळबळ..


पुणे : पुण्यामध्ये कोयता घेऊन रस्त्याने फिरने, गुंडागर्दी करणे अशी गुन्हेगारी दिवसानुदिवस वाढतच आहे. अशीच एक माहिती पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. मित्राला मारहाण केल्याचे समजून टोळक्याने तरुणावर तलवार व कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी (ता. ६) घडली.

याप्रकरणी, तोहीद अस्लम शहा (२१, रा.नेहरुनगर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच सलीम पटेल, सुनील बग्गी, जुबेर शेख, शुभम दुबे, सुशांत सोनवणे तसेच इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संशयित शनिवारी दुचाकीवरून महेशनगर, नेहरुनगर येथे आले. फिर्यादी तोहीद शहा यांनी त्यांच्या मित्राला मारहाण केली असल्याचे समजून तलवारीने व काेयत्याने वार केला. वार चुकवताना फिर्यादी शहा यांच्या हाताला मार लागला. तसेच त्यांना हाताने व पायाने मारहाण करून शिवीगाळ केली होती. वारंवार घडणाऱ्या या गुंडागर्दीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!