थेऊरमध्ये तडीपार गुंडाच्या टोळक्याकडून महिलांसह कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण, आरोपी अजूनही अटक नाही…


उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गालगत थेऊर येथील राखपसरे वस्ती परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी दुचाकीचा धक्का लागल्याने तडीपार गुंडाच्या टोळक्याने एका कुटूंबातील सर्वांनाच लोखंडी रॉड, दगड आणि विटाने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

यामध्ये स्वप्नील काळभोर, सतीश काळभोर, गोटू शेंडगे, दिलीप काळभोर, जयश्री काळभोर आणि सिंधु काळभोर हे जखमी झाले आहेत. याबाबत अजून आरोपींना अटक केली नाही. फिर्यादी सिंधु काळभोर या आपला मुलगा, सून यांच्या समवेत कुंजीरवाडी येथील काळभोर वस्ती परिसरात राहतात.

फिर्यादी काळभोर याना त्याचे कामगार गोटू शेंडगे याने सांगितले की, पुणे – सोलापूर महामार्गालगत थेऊर फाट्याजवळ माझ्या दुचाकीचा धक्का एका अनोळखी इसमाच्या दुचाकीला लागल्याने तो शिवीगाळ करून त्यांना मारहाण करत आहे. स्वप्निल काळभोर, दिलीप काळभोर हे याठिकाणी पोचले. त्यांच्या कामगाराला आरोपी हे लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते.

नंतर आरोपी स्वराज राखपसरे याने फिर्यादी यांना शिवगाळ करत त्यांच्या कानशिलात लगावली. आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांना जखमी केले. याबाबत आता कारवाईची मागणी केली जात आहे. सिंधु शरद काळभोर (वय-५३, रा. कुंजीरवाडी, काळभोर वस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

स्वराज राखपसरे, संजय राखपसरे (वय-४०), पांडा राखपसरे (वय-४५), अजय अशोक राखपसरे (वय-३२), माऊली राखपसरे (वय-३५) सर्व राखपसरे वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) आणि इतर ५ ते ६ अनोळखी इसम यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजून कोणाला अटक केली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!