खेड तालुक्यात गणेशोत्सवाला गालबोट ; विसर्जनावेळी चौघांचा बुडून मृत्यू…


पुणे : राज्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जनाचा उत्सव शिगेला पोहचला असताना खेड तालुक्यात दुर्देवी घटना घडली आहे. गणपती विसर्जनावेळी वाकी बुद्रुक,बिरदवाडी आणि शेल पिंपळगाव या ठिकाणी चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या जल्लोषात महात्मा फुले चौक चाकण येथील शिवशाही करिअर अकॅडमीचे काही विद्यार्थी गणरायाच विसर्जन करण्यासाठी वाकी खुर्द हद्दीतील घोडदरी भागात भामानदीच्या काठावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास विसर्जना वेळी एक तरुण बुडू लागला.त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी एका तरुणाला बुडवण्याने मिठी मारल्याने दोघेही पाण्यात गेले. या घटनेत अभिषेक अशोक भाकरी व अनंत जयस्वाल यांचा मृत्यू झाला. दरम्यान यातील एकाचा मृतदेह हा तात्काळ बाहेर काढण्यात आला. मात्र दुसऱ्याचा मृत्यू उशिरापर्यंत मिळाला नव्हता चाकण रेस्क्यू टीम, एफडीएफ व अग्निशमन दल शोध कार्य करत आहे.

दरम्यान बिरदवाडी आणि शेल पिंपळगाव येथे ही विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली. बिरदवाडी येथे गणेश विसर्जन करताना संदेश पोपट निकम याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. तर शेल पिंपळगाव येथील तरुणांचाही मृत्यू झाला. या सर्व घटनांमुळे उत्सवाचे वातावरण शोकाकुल झाले असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!