साईनाथ केंद्रेला गणपती पावला ! मिळाला एका मालिकेत रोल ..!!

Marathi Serial : काही दिवसांपूर्वी आमच्या पप्पानी गंम्पती आणला हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. हे प्रसिद्ध गाणे साईराज केंद्रे या चिमुकल्याने गायले आहे. या गाण्याच्या माध्यमातून तो घरोघरी पोहोचला आहे. अशातच आता हा चिमुकला झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो आला आहे.
त्यात या चिमुकल्याची सिंघम स्टाईलने एंट्री दाखवली आहे. साईराज केंद्रे आता प्रेक्षकांना ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत झळकणार आहे. दरम्यान, झी मराठीवरील या लोकप्रिय मालिकेत आतापर्यंत खूप बदल दाखवण्यात आले आहेत. या मालिकेत अप्पीची उत्तराखंडला बदली झालेली दाखवली आहे. यावेळी अर्जुन अप्पीसोबत न जाण्याचा निर्णय घेतो.



पण आता अमोल आणि त्याचा बाबा अर्जुन यांची भेट होणार का? अर्जुनला समजेल का तो मुलगा आपलाच आहे? अप्पी आणि अर्जुन यांची पुन्हा एकदा भेट होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मालिकेदरम्यान सापडतील. पण अप्पी आमची कलेक्टर ही मालिका साईराज केंद्रे याच्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
Views:
[jp_post_view]
