Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पा मोरया!! यंदाची गणेशमूर्ती स्थापना आणि पूजेचा मुहूर्त कसा आहे, जाणून घ्या…

Ganesh Chaturthi 2024 : देशात सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. कारण काही दिवसांत लाडक्या गणरायातं आगमन होणार आहे. अनेकांच्या घरात, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची स्थापना होणार आहे.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर भाविक घरोघरी गणपतीची मूर्तीची स्थापना करतात आणि दहा दिवस त्यांची पूजा करतात. परंतु काही लोक ५ ते ७ दिवसांनी मूर्तीचं विसर्जन करतात. अशात गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती किती दिवस घरात ठेवावी? असा प्रश्न देखील अनेकांना पडलेला असतो.
दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टि करण (भद्रा) तसेच राहूकाल इत्यादी वर्ज्य नाही.
शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरदेखील करता येऊ शकते. Ganesh Chaturthi 2024
गणपतीची पूजा, आरती…
काही जणांकडे गणेशोत्सव दीड दिवस, ५, ७ दिवस, तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. काही जणांकडे गौरी / महालक्ष्मी बरोबर गणपती विसर्जन करण्याची परंपरा असते, अशा वेळेस तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार, नक्षत्र असताना त्या दिवशी विसर्जन करता येते.
तसेच काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धती आहे. पण ती बरोबर नाही. घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते.
वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.
गौरी पूजनाचा मुहूर्त…
दि. १० सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने ११ सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.