Ganesh Chaturthi 2023 : पूर्व हवेलीत विघ्नहर्त्याचे उत्साहात आगमन; डीजे, ढोल -ताश्यांचा गजरात सार्वजनिक गणेश मंडळांची प्राणप्रतिष्ठापणा…!
Ganesh Chaturthi 2023 उरुळी कांचन : ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत आणि गणरायाचा जयघोष करीत पूर्व हवेलीत विघ्नहर्त्याचे उत्साहात आगमन झाले. डीजे, ढोल -ताश्यांचा गजरात सार्वजनिक गणेश मंडळांची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. Ganesh Chaturthi 2023
उरुळी कांचन मधील आश्रम रोड परिसरातील महात्मा गांधी तरुण मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ, बाजार मैदान येथील अनुपम मित्र मंडळ, भोलेनाथ तरुण मंडळ, गूळ आळी येथील श्रीमंत वीर तरुण मंडळ, तुपे वस्ती येथील नवजीवन मित्र मंडळ, महात्मा गांधी रास्ता परिसरातील श्रीकृष्ण मित्र मंडळ, साईनाथ तरुण मंडळ, पोलिस चौकी परिसरातील नवचैतन्य मित्र मंडळ, तळवाडी चौक परिसरातील अखिल तळवाडी मित्र मंडळ.
शिंदवणे रोड येथील नव आझाद तरुण मंडळ या महत्त्वाच्या मंडळांप्रमाणेच परिसरातील सर्व गणेश मंडळे व घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. शिंदवणे येथील शिवछत्रपती तरुण मंडळ, सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ, अखिल सोरतापवाडी सार्वजनिक गणेश गावठाण, गणेशनगर मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, एकता तरुण मंडळ, शिवतेज मित्र मंडळाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.
लोणी काळभोर गावातील श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळ, क्रांतिवीर व समता समाज मित्र मंडळ, महात्मा गांधी प्रतिष्ठान, जय महाराष्ट्र व जय बजरंग मित्र मंडळ, तिरंगा व गणराज मित्र मंडळ, आदर्श तरुण मंडळ, अखिल रायवाडी मित्र मंडळ, महात्मा फुले व त्रिमूर्ती मित्र मंडळ आदी मंडळांनी उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत केले. कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीतील लोणी स्टेशन येथील श्रीगणेश मित्र मंडळ, मूनलाईट मित्र मंडळ व धर्मवीर संभाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
संभाजीनगर येथील अष्टविनायक मित्र मंडळ, कदमवस्ती येथील सम्राटमित्र मंडळ, वाकवस्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळ, कवडीपाट येथील श्री विनायक प्रतिष्ठान मित्र मंडळाने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा केली.