Ganesh Chaturthi 2023 : उद्या लाडक्या गणपती बाप्पाचे होणार आगमन, जाणून घ्या मंगलमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त..


Ganesh Chaturthi 2023 पुणे : सध्या गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे सर्वजण तयारी करत आहेत. आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवाला उद्या (ता.१९) सुरुवात होत आहे. यामुळे सर्वजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट बघत आहेत. (Ganesh Chaturthi 2023)

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी पार्थिव श्रीगणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते.

त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण, इ. वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत. म्हणून यावर्षी १९ सप्टेंबर रोजी भद्रा व वैधृति योग असला तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्तापासून (पहाटे पासून) मध्याह्नापर्यंत म्हणजे सुमारे पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत कधीही आपल्या घरात गणेशाची स्थापना करता येईल.

तसेच गणपतीची मूर्ती साधारणतः ८ – १६ दिवस आधी आणू घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही.

एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते. मंडळे देखील तयारी करत असून अनेक ठिकाणी देखावे तयारी करण्याची लगबग सुरू आहे.

यंदाचे गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस जाणून घ्या…

१९ सप्टेंबर २०२३, मंगळवार – श्रीगणेश चतुर्थी
(पहाटे ४:५० पासून दपारी १:५० पर्यंत कधीही घरात गणेशाची स्थापना करता येईल.)

२१ सप्टेंबर २०२३, गुरुवार – गौरी आवाहन
(सूर्योदयापासून दपारी ३:३५ पर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.)

२२ सप्टेंबर २०२३, शुक्रवार – गौरी पूजन

२३ सप्टेंबर २०२३, शनिवार – गौरी विसर्जन
(सूर्योदयापासून दपारी २:५६ पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.)

२८ सप्टेंबर २०२३, गुरुवार – अनंत चतुर्दशी
(अधिक माहितीस्तव – पुढील वर्षी श्री गणेशाचे आगमन १२ दिवस लवकर म्हणजे ७ सप्टेंबर २०२४ रोजी शनिवारी होणार आहे.)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!