Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधी यांना महात्मा, राष्ट्रपिता, बापूजी… या पदव्या कोणी आणि का दिल्या, जाणून घ्या….


Gandhi Jayanti 2023  मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी, बापू किंवा राष्ट्रपिता. गेल्या कित्येक दशकांपासून ही सगळी नावं समानअर्थी आहेत. महात्मा गांधी यांना महात्मा, राष्ट्रपिता, बापूजी या पदव्या कोणी दिल्या ते आज आपण जाणून घेऊयात… Gandhi Jayanti 2023

गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी कुणी दिली कधी दिली? किंवा का दिली? यावर अनेकांचे मत वेगवेगळे आहेत. पण मिळालेल्या माहितीच्या आधारे असे स्पष्ट होते की, महात्मा हे संबोधन चंपारण्यच्या आंदोलनानंतर गांधींना मिळालं होत. Gandhi Jayanti 2023

त्यांना पहिल्यांदा या नावाने कोणी संबोधित केले हे सांगणे कठीण आहे. पण त्याचं श्रेय रवींद्रनाथ टागोर यांना दिले जाते. पण आपल्या सात्विक राहाणीमुळे त्यांनी देशभरातल्या लोकांना प्रभावित केले. ‘महात्मा’ हे नाव त्यांच्यासाठी ठरून गेले.

       

पण आजकाल महात्मा गांधी ना ‘राष्ट्रपिता’ हे संबोधन वादग्रस्त ठरलंय. उजव्या विचारसरणीचे काही लोक नेहमी प्रश्न विचारतात की गांधी ‘राष्ट्रपिता’ कसे असू शकतात?वरवर गप्पा करणाऱ्या लोकांना एकवेळ सोडून देऊ पण अनेक लोक गंभीरतेने हा प्रश्न विचारतात की त्यांना ही पदवी का दिली गेलीये? २०१२ साली काँग्रेस सत्तेत असताना लखनऊच्या एका विद्यार्थ्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे यासंदर्भात कायदा बनवण्याची मागणी केली होती.

तेव्हा गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं होत की, राज्यघटनेच्या कलम 18 (अ) नुसार सैन्यातलं पद किंवा शैक्षणिक पात्रता ही दोन क्षेत्र वगळता, कोणत्याही पदव्या दिल्या जात नाहीत. किंवा नावासमोर धारण करण्यास मनाई आहे. गौरव अग्रवाल या हाथरसचे रहिवासीनी केलेल्या एका माहितीचा अधिकार याचिकेला उत्तर देताना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जानेवारी २०२० मध्ये स्पष्ट केले.

भारत सरकारने ना कधी असा नियम बनवला ना या संदर्भात कोणता अध्यादेश काढला होता. आणखी एका प्रकरणात अनिल दत्त शर्मा नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून महात्मा गांधींना अधिकृरित्या ‘राष्ट्रपिता’ घोषित करण्याची मागणी केली तेव्हा तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे आणि आणि आणखी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे मान्य केले,

की महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत आणि देशाला त्यांच्याप्रति अतिशय आदर आहे पण अशी अधिकृत पदवी देता येणार नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे महात्मा गांधींना हे ‘राष्ट्रपिता’ ही पदवी कोणी दिली आणि त्याच्या मागे काय कारण होतं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!