पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; कारण..

पुणे : पिंपरी- चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

विशाल माने असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचारीचे नाव. विशाल माने हे भोसरी एमआयडीसी या पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी (ता. २५) विशाल माने यांची साप्ताहिक सुट्टी होती, ते मित्रांसमवेत बाहेर फिरण्यासाठी गेले होते. रात्री घरी आल्यानंतर त्यांनी आई- वडिलांसह गप्पाही मारल्या, त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने आजूबाजूच्या व्यक्तींना बोलवून दरवाजा तोडला तेव्हा विशाल हे लटकलेल्या अवस्थेत आढळले.

विशाल माने यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि मुलं आहेत. त्यांची पत्नी नुकतीच माहेरी गेली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विशाल माने यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांच्या जाण्यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर शोककळा पसरली आहे