Gadchiroli News : धक्कादायक! महिला कामासाठी शेतात गेली, अचानक नको तेच घडलं, खळबळजनक घटनेने गाव हळहळलं..
Gadchiroli News गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात मोठ्या पट्टेदार वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ (Gadchiroli News) उडाली आहे.
महानंदा दिनेश मोहुर्ले (४८) असे या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, महानंदा मोहुर्ले ही शिवराज-फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगलालगत असणाऱ्या स्वतःच्या शेतावर गवत काढायला गेली होती. ती गवत काढण्यात मग्न असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला करत तिला ठार केले.
हल्ला होताच महानंदाने प्राणांतिक किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतात असलेले शेतकरी आणि मजूर आवाजाच्या दिशेने धावले. तेव्हा वाघ महानंदाचे शरीर ओढून नेत असल्याचे दिसून आले.
लोकांनी मोठमोठ्याने आवाज करत धाव घेतली असता वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत महानंदाचा मृत्यू झाला होता. सध्या शेतातील निंदणी सुरू आहे.
तसेच पाऊस पडल्याने पाणी लावण्यासाठी आणि इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतात जातात. मात्र या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानीची तात्काळ आणि दीर्घकालीन भरपाई नियमांनुसार पिडीत परिवाराला देण्यात येणार असल्याचे वडसा वन विभागाचे विभागीय वनाधिकारी यांनी सांगितले आहे.