Gadchiroli : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार..


Gadchiroli : भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशानं तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती १३ मे रोजी सकाळी पोलीस विभागाला मिळाली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ‘सी-६०’च्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परिसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Gadchiroli

गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर १ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह परमिली दलमचा प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडंट वासूचा असल्याचे निष्पन्न झाले. महिला नक्षलवाद्यांची ओळख अद्यापतरी पटलेली नाही.

दरम्यान, गोळीबाराच्या ठिकाणाहून घटनास्थळी तीन स्वयंचलित शस्त्रे, एक एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास असे साहित्य आणि नक्षल साहित्य आढळून आले आहे.

हे साहित्य जप्त केले असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. या परिसरात नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!