Gadar- 2 Movie Box Office Collection : ‘गदर- २’ चा जलवा कायम! तोडले ‘बाहुबली- २’ चे रेकॉर्ड, केली मोठी कमाई….
Gadar- 2 Movie Box Office Collection मुंबई : ‘गदर’ च्या यशानंतर तब्बल २२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘गदर-२’ चित्रपटाने (Gadar- 2 Movie Box Office Collection) देखील प्रेक्षकांची मनेजिंकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
या चित्रपटाने सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करत बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली-२’ चित्रपटाला टक्कर दिली असून प्रदर्शित झाल्यानंतर २९ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
‘गदर-२’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे २९ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाने ५११ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. यासोबतच हा सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘किंग खान’ म्हणजेच शहारुख खानचा ‘पठान’ चित्रपट येतो. पठान चित्रपटाने ५४३ कोटींचा गल्ला जमा केला होता. तर ‘गदर-२’ ला ‘पठान’चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ३५ कोटी रुपये आणखी कमवावे लागतील. तर ‘बाहुबली-२’ च्या हिंदी वर्जनने ५१०.९९ कोटींची कमाई केली होती.
दरम्यान, २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली-२’ चित्रपटाने सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड तोडत ५१० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पुढच्या ५ वर्षांत या चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात कोणत्याही चित्रपटाला यश आले नव्हते.
अखेर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठान’ चित्रपटाने बाहुबलीचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ ने देखील ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड ब्रेक करत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.