ओला-उबरवाले वेळेवर पैसे देत नसल्याचे नैराश्य ; कॅब चालकाने उचललं टोकाचं पाऊल

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात ओला उबर ड्रायव्हर्स सध्या आंदोलन करत आहेत .यातच कॅब कंपन्या वेळेवर पैसे देत नसल्याच्या नैराश्यातून नालासोपाऱ्यात ओला उबेर चालकांने राहत्या घरी विषप्रशन करून आयुष्य संपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरोज सक्सेना (46)असे मृत चालकाचे नाव आहे .त्याने काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरी विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं .त्याच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाने त्याच्या आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितलं . ओला उबर कंपन्या पैसे वेळेवर देत नसल्याने कॅब चालक मानसिक त्रासात होता .याच कारणामुळे त्यांनी आपले जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे .
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई सह राज्यभरातील ओला उबेर चालक आंदोलन करत आहेत .त्यांनी आप कंपन्यांकडून कमी होणाऱ्या कमाई विरोधात आवाज उठवला असून काळी पिवळी टॅक्सी प्रमाणे त्यांनाही दर किलोमीटर मागे 32 रुपये भाडे द्यावे तसेच ॲप कंपन्या घेत असलेलं अधिकच कमिशन कमी करावे यासाठी राज्यभरातील कॅब चालक आंदोलन करत आहेत .

दरम्यान कॅब कंपन्या वेळेवर पैसे देत नसल्याच्या नैराश्यातून वाहन चालकाने आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .