उद्यापासून पुणे ते अजमेर विशेष गाड़ी सुरू होणार !

पुणे : प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते अजमेर आणि मदार जंक्शन ते पुणे दरम्यान एक विशेष गाड़ी २२ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.

गाड़ी क्रमांक 01169 पुणे – अजमेर सुपर फास्ट एक्सप्रेस विशेष गाडी पुणे येथून 21.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 18.30 वाजता अजमेरला पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01170 मदार जंक्शन – पुणे सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस मदार जंक्शन येथून रविवारी 26 नोव्हेंबरला 19.50 वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता पुणे येथे पोहचेल.
प्रवासादरम्यान ही गाडी लोणावळा , कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम , कोटा , सवाई माधोपुर, जयपुर, किशनगढ़ आणि मदार स्टेशन वर थांबा घेणार आहे .

अशी असणार गाडीची कोच संरचना
शयनयान श्रेणी- 04,
एसी थ्री-10, एसी थ्री इकॉनॉमी-02, सामान्य श्रेणी -03
गाड्यांची माहिती , स्टॉपेज आणि वेळापत्रक या करीता कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.