मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रातील महत्वाच्या महामार्गांवर टोल लागणार नाही, वाहन धारकांना सर्वात मोठा दिलासा…


मुंबई : राज्य शासनाने मुंबईतील एका महत्त्वाच्या मार्गावर टोल माफी जाहीर केली आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अटल सेतूवर आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान विकसित करण्यात आलेल्या भारतातील या समुद्रावरील सर्वाधिक लांबीच्या पुलावरून आता नागरिकांना फ्री मध्ये प्रवास करता येणार आहे.

तसेच या टोल माफीचा फायदा फक्त इलेक्ट्रिक वाहनधारकांना होणार आहे. खाजगी आणि शासकीय इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांना आता अटल सेतूवर टोल द्यावा लागणार नसून याचा निर्णय काल २१ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आला आहे.

दरम्यान, महत्त्वाची बाब अशी की याची अंमलबजावणी आज २२ ऑगस्ट पासून होईल. खरे तर या योजनेची घोषणा एप्रिल महिन्यातच झाली होती मात्र आजपासून प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे फक्त अटल सेतूवरच नाही तर राज्यातील इतरही महत्त्वाच्या दोन महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावर सुद्धा लवकरच इलेक्ट्रिक वाहणांना टोल माफी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसात या दोन्ही महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहणांना टोल माफी देण्याबाबतचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले होते.

याच धोरणाचा एक भाग म्हणून आता राज्यातील प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातोय. अटल सेतू वर टोल माफी देण्याचा निर्णय देखील याच धोरणाचा भाग आहे. खरेतर एप्रिलमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावर सर्व इलेक्ट्रिक चारचाकी गाड्या आणि बस यांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!