मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण…. अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांकडून पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा?


पुणे : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.यात विविध योजनासह प्रकल्पाची घोषणा देखील करण्यात आली. पुण्याच्या विकासासाठी फडणवीस आणि अनेक प्रकल्पना मंजुरी दिली तर काही सुरू असलेल्या प्रकल्पांचा विस्तार केला. जाणून घ्या सविस्तर माहिती.

अर्थसंकल्पात पुणे शहराला काय काय मिळालं?

1. बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला निरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यात मदत होईल अशी आशा येथील ग्रामस्थांनाही आहे.

2. पुणे लोणावळा तिसऱ्या व चौथा रेल्वे मार्गीकेच्या पाच हजार 100 कोटी रुपयांचा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल.

3.पुणे महानगर मेट्रो टप्पा दोन मधील खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी या मेट्रो मालिकेच्या उपमार्गीका हडपसर ते लोणी काळभोर हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

4.पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पा लादेखील मान्यता देण्यात आली आहे.

5. येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी दुहेरी मार्गाचा अहवाल तयार करण्यात येत आहे.

6.पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबीची 7514 कोटी रुपये किमतीचे काम मंजूर करण्यात आले आहे

7.तळेगाव चाकण हा 6499 कोटी रुपयांचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग चाकण शिक्रापूर या 5232 कोटी रुपयांच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

8.पुणे ते छत्रपती संभाजी नगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजी नगर या १९२ किलोमीटर लांबीच्या 14886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.

9.हडपसर यवत या 5262 कोटी रुपये किमतीच्या 31. 50 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

९) याशिवाय देहू येथे विकास आराखडा राबविण्याची घोषणा करण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्थळाच्या विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर करताना त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!