मित्राच्या पत्नीला अश्लिल व्हिडीओ व फोटोची भिती घालून दोघा मित्रांकडून बळजबरीने बलात्कार! पेठ येथील माजी सरपंचासह सावकार मित्रावर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…


उरुळीकांचन : जिवलग मित्राच्या सोबत राहून मित्राला दोघा मित्रांनी अर्थिक स्वरुपाचे प्रलोभने दाखवून ५ ते ६ लाख रुपये मित्राने दिलेली परत करत नाहीम्हणून माजी सरपंच असलेल्या मित्राने महिला ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सावरकर मित्रासोबत मित्रत्वाच्या नात्यातील संबंधांचा गैरफायदा घेऊन मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवून दोघा मित्रांनी मित्राच्या पत्नीवर वेळोवेळी बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार पेठ (ता.हवेली ) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट ) च्या पदाधिकारी व सावकार मित्रावर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पिडीत महिलेने पतीसह उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पेठचा माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी व त्याचा सावकार मित्र राजेश लक्ष्मण चौधरी यांच्यावर बलात्कारासह जीवे मारण्यासाठी मानसिक छळ सायबर गुन्हे नियंत्रण कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या दोघा नराधमांना उरुळीकांचन शनिवार (दि.५ ) रात्री उशीरा अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेच्या पतीचे हे दोघे आरोपी मित्र आहे. आरोपी राजेंद्र लक्ष्मण चौधरी हा महिलेचा पतीचा मित्र असलेल्या या नात्याने आरोपी हा महिलेच्या घरी ये -जा होता. मित्राला अर्थिक देवाघेवाण या व्यवहारातून तो महिलेशी पतीच्या ५ ते ६ लाख रुपये दिलेल्या रक्कमेची मागणी करीत होता. यावर मित्राने या अर्थिक व्यवहारात असलेल्या रक्कमेचा गैरफायदा घेऊन माझ्याकडे तुझे अश्लील फोटो आहेत म्हणून व्हायरल करेन म्हणून भिती दाखविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला गावात बोलवून त्याच्या स्वीफ्ट गाडीत बसवून तिला लोणीकाळभोर येथे लॉज मध्ये नेऊन बळजबरीने संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतरही भांडगाव येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. त्यानंतर पिडीत महिलेची इच्छा नसताना तिच्या अकाउंटवर ५ ते ६ लाख रुपये सोडले.

त्यानंतर तिच्याकडून पतीच्या सहीत त्याला दिलेल्या रक्कमेची मागणी करु लागला. त्यानंतर पिडीतेने ८ लाख रुपये आरोपी राजेश चौधरीला देऊन त्याला फोटो डीलीट करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने उर्वरित रक्कमेसाठी तगादा लावून पिडीत महिलेला पतीसह मुलाला जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. तर दुसरा आरोपी माजी सरपंच सुरज चौधरी याने या पिडीत महिलेला बोलावून तुझ्याशी चर्चा करायची म्हणून तुझे नग्न फोटो राजेश चौधरी याने काढले आहेत. ते फोटो दाखविल म्हणून भिती दाखवून पिडीत महिलेशी शाररीक संबंध ठेवले आहेत. या दोघांनी २० फेब्रुवारी २०२३ ते २८ एप्रिल २०२५ पर्यंत हा प्रकार केला आहे.

दरम्यान या संबंधितत गुन्ह्याची तक्रार उरुळीकांचन पोलिस ठाण्यात झाल्यानंतर या महिलेला तक्रार दिली म्हणून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सई मटाले या करीत आहेत.

आरोपी माजी सरपंच आमदार कटकेंचा विश्वासू सहकारी!

या बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपी माजी सरपंच सूरज चौधरी व राजेश चौधरी हे शिरुर- हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. कटके यांच्या कामकाजाची सर्व मुख्यत्वे सूरज चौधरी हा पाहत आहे. आ. कटकेंचा यांच्या सर्व दौऱ्यांत सूरज चौधरी सहभाग असल्याची चर्चा नागरीक करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!