मैत्रिणीने बियर पाजली, शुद्ध हरपल्यानंतर…!! 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाकडून धक्कादायक प्रकार, घटनेने सगळेच हादरले


बदलापूर : बदलापूरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली होती.

नंतर तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला. ती तरुणी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं.

नंतर या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तिला काही समजले नाही. नंतर मात्र घडलेला प्रकार समोर आला. यामुळे ती घाबरली.

दरम्यान, तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तसेच या प्रकरणी तपास केला असता अवघ्या 12 तासात आरोपी रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी हा बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. घटनेनंतर तो फरार झाला होता. मात्र पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी माहिती दिली आहे. पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी ही घटना घडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!