दौंड शहरात तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत फ्री स्टाईलने हाणामारी, नेमकं घडलं काय?


दौंड : एका तरुणाला शुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दौंड शहरात के.जी कटारीया कॉलेजमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडित तरुणाने तक्रार दाखल केली असून, १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश दिनेश वाघेला (वय. २१) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर मुख्य आरोपींची नावे जवाद शेख, अरमान शेख, फरान शेख, मोन्या शेख, इरशाद शेख (सर्व रा. दौंड) अशी आहेत. या प्रकरणात आणखी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची नाव अद्याप समोर आलेली नाहीत.

पीडित तरुणाने याप्रकणी माहिती दिली आहे की ‘आई, वडील आणि मी आम्ही तिघेजण एकत्र राहतो तर माझे वडील हे नगरपालिकामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. मी सध्या के.जी कटारीया कॉलेजमध्ये टी वाय बी एस सी मध्ये शिक्षण घेत असल्याचं त्याने सांगितलं.

घटनेच्या दिवशी (४ ऑगस्ट 2025) दुपारी १२.३० वाजण्याचे सुमारास क्लासमध्ये असताना सर्व कॉलेजमधील मुले शिक्षक दिवस साजरा करीत होते. त्यावेळी मी तेथे खुर्चीवर बसलेलो असताना कॉलेजमधील जवाद शेख हा तिथे आणि त्याने मला खुर्चीवरुन उठ म्हणत दुसऱ्या बाजूला बसण्यास सांगितले. मी त्याला तू दुसरीकडे बस असं म्हणालो असता त्याला राग आला आणि त्याने मला जातीवाचक शिवीगाळ करत तुला लय माज आला आहे का? असं म्हणत भांडण सुरु केले.

यावेळी मी माझ्या काकाला निखिल वाघेला (चुलते) याला फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला. काकाने मला तू भांडण करू नकोस मी येतो असं सांगितलं. तेवढ्यात जवाद शेख याच्या सोबत आलेला आरमान शेख, फरान शेख यांनी देखील मला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. मला भं** म्हणत तुम्हाला लय माज आला आहे का? तुमच्या गणपती मिरवणुकीत राडा घालू, मुर्त्या फोडु कशी मिरवणुक काढतात तेच बघु असे म्हणत मारहाण केली.

त्यांनी मला पकडून गेटच्या बाहेर रोडवर आणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गेटच्या बाहेर उभे असलेले जवादचे मित्र मोन्या शेख व इरशाद शेख यांनी देखील मारायला सुरुवात केली. यावेळी तिथे आणखी १० ते १५ जण आले आणि त्यांनी देखील मारहाण केली.

तेवढ्यात मोन्या शेख याने खिशातून फायटर काढून माझ्या डोक्यात आणि छातीवर मारले. या मारहाणीत रितेश वाघेलाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. रितेशला मारहाण होत असताना त्याचा काका तेवढ्यात तिथे आणि त्याने रितेशला बाजूला काढले. यावेळी त्या सर्वांनी त्याच्या काकाला देखील शिवीगाळ करत तुम्ही बाथरुम साफ करणारे तुमची कॉलेजमध्ये यायची लायकी नाही. असं म्हणत अपमानित केले.

यानंतर काकाने रितेशला मोटार सायकलवर बसवून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पोलिसांनी रितेशला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यांनंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन रितेशचा जवाब घेतल्यानंतर या संबंधित गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!