एसटीचा मोफत प्रवास बंद होणार? परिवहन मंत्र्यांकडून सर्वात मोठी अपडेट…


मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो. त्यामुळे महिलांची एसटी प्रवासाला पसंती मिळत असून, एसटीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे.

दुसरीकडे वय वर्ष ६५ वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे ७५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीनं मोफत प्रवास करता येतो.

तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील एसटीच्या प्रवासासाठी पास प्रणालीचा लाभ मिळतो. त्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत, पण एसटी महामंडळाला सध्या आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मोफत प्रवास योजना बंद होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, एसटी बसच्या मोफत प्रवासाच्या निर्णयाला थांबवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. एसटी बसला सर्वसामान्यांची लाईफलाईन मानले जात असून, त्याच्या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळत आहे. त्यामुळे, मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याशिवाय, सरनाईक यांनी डिजिटल बोर्ड लावण्याच्या संदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. त्यानुसार, एसटी महामंडळाला विश्वासात न घेतल्याने माहिती व जनसंपर्क विभागाची प्रक्रिया चुकीची होती.

टेंडर प्रक्रिया थांबवण्यास आम्ही सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये बसवर हल्ला झाल्याच्या घटनेवरही सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आणि अस्मितेवर हल्ला करणे चुकीचे असल्याचे म्हटले

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!