पुण्यात मोफत चिकन!! स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून आयोजन, अनेकांनी केला धुमधडाक्यात आखाड साजरा..

पुणे : पुण्यात आयडी दाखवा आणि आखाड साजरी करा या मोहिमेअंतर्गत तब्बल ५,००० किलो चिकनचे मोफत वाटप करण्यात आले आहे. शहरात आखाड सणानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामुळे अनेकांनी या संधीचा फायदा घेत जोरदार नियोजन केले. पुण्यातील धानोरी परिसरात धनंजय जाधव फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.

तसेच स्थानिक प्रशासन आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. या अपक्रमाअंतर्गत लाभमिळवण्यासाठी नागरिकांना फक्त त्यांचे ओळखपत्र दाखवून मोफत चिकन मिळत आहे. यामुळे अनेकांची दिवाळी साजरी झाली. या योजनेअंतर्गत वाटप होत असलेल्या चिकनचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी नेले आहेत.
मोफत चिकन वाटप करत असताना यंत्रणांही सज्ज असल्याचे दिसून आले आहे. धानोरी परिसरातील ४ दुकानांवर हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांनी आखाड सण साजरा केला आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

आयोजकांनी सांगितले की, या मोहिमेचा उद्देश सणाच्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेणे हा होता. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आयोजकांचे कौतुक केले असून, सोशल मीडियावरही या उपक्रमाची चर्चा जोरात सुरू आहे. याचे फोटो देखील सध्या व्हायरल होत आहेत.
स्थानिक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण म्हटले आहे. चार दुकानांवर हा उपक्रम राबवला जात आहे. यामुळे अनेकांनी या संधीचा फायदा घेत जोरदार नियोजन केले. यामुळे अनेकांनी आयोजकांचे कौतुक केले आहे.